खेड / प्रतिनिधी
खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी शासकीय निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अखेर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपरिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी रितसर तक्रार दाखल केली आहे. जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत शासकीय निधीमधून त्यांच्या वाहनाला पाच लाख 15 हजार 479 रुपये 91 पैसे वापरून इंधन पुरवठा करत शासकीय निधीचा अपहार करून फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.