Tarun Bharat

मोठी दुर्घटना टळली! झाडांमुळे प्रवाशांना जीवदान…

लांजा आगाराची बस धरणात पडताना वाचली : धरणाच्या कडेला असलेल्या झाडांना बस अडकल्याने मोठा अर्थ टळला : कॉलेज विद्यार्थी व प्रवाशांनी भरलेली होती बस: रिक्षाला धडक दिल्याने रिक्षाचे नुकसान

Advertisements

प्रतिनिधी/लांजा

विद्यार्थी व प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या लांजा आगाराच्या एस टी बसला सोमवारी अपघात झाला. बेनीखुर्द धरणावर एका झाडाला बस अडकल्याने लांजा आगाराची लांजा-वाडगाव ही बस 20 फुट खोल धरणात कोसळता कोसळता वाचली. अपघात सोमवारी दुपारी 2.30 च्या दरम्यान तालुक्यातील बेनीखुर्द धरणावर घडला.

रिक्षाला धडक देऊन एसटी बस झाडावर जाऊन कलंडली. बस झाडाला अडकल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या अपघाताबाबत माहिती अशी की, लांजा एसटी आगाराची लांजा-वाडगाव बस (एमएच 14, बीटी-3005) ही लांजा आगारातून 2 च्या दरम्यान वाडगावच्या दिशेने निघाली होती. बस बेनीखुर्द धरणावर आली असता चालकाचा बसवरील ताबा सुटला व बसने समोरुन बेनीखुर्द ते लांजाच्या दिशेने जाणाऱ्या एका रिक्षाला ( एमएच 08, 2565 ) धडक दिली. रिक्षा चालक सुनील चव्हाण यांनी प्रसांगवधान राखून रिक्षाबाहेर उडी मारल्याने ते बचावले.

त्यामुळे रिक्षाचे नुकसान झाले. बसच्या वेगावर नियंत्रण आणताना बस डाव्या बाजुला असलेल्या धरणाच्या पात्रापासून चार ते पाच फुटावर जाऊन कलंडली व त्या ठिकाणी झाड असल्याने बस झाडाला अडकली. बस धरणात कोसळणार या भितीने बस मध्ये असलेल्या कॉलेज विद्यार्थी व प्रवाशांनी जोरदार आरडाओरडा केला. बस झाडाला जाऊन अडकल्याने विद्यार्थ्यांनी वाहक व चालकाच्या मदतीने आपत्कालिन खिडकी उघडून बस बाहेर उड्या मारल्या व इतर प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले.

या उपघाताची माहिती मिळताच इतर वाहनचालक प्रवाशी व बेनीखुर्द येथील नागरीक मदतीला धाऊन आले. सद्या जोरदार पावसाळा सुरु असुन बेनीखुर्द धरण तुडुंब भरले आहे . या धरणाच्या दुतर्फा धरणाचे पाणी असुन धरणाच्या मध्यभागातून लांजा-वाडगाव-गोविळ रस्ता गेला आहे. या मार्गावरुन नियिमित
लांजा- वाडगाव बस फेऱ्या सुरु असतात. यासह वाहनांची दिवस-रात्रा वर्दळ असते. या ठिकाणी अपघातक्षेत्र नसताना एस टी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात रिक्षाचे नुकसान झाले आहे.

Related Stories

जिल्हा परिषद आरोग्य विभागावर सत्ताधाऱयांचेच ताशेरे

Patil_p

बोलक्या बाहुल्यातून शिक्षण आनंददायी करणारे ‘कला शिक्षक’

Patil_p

स्वप्नाली सावंत यांचा नायलॉनच्या दोरीने आवळला गळा

Patil_p

‘गोष्ट एका कावळय़ाची’वर आंतरराष्ट्रीय मोहोर!

Omkar B

रत्नागिरी : खेड पंचायत समिती सभापतींसह तिघांना कोरोना

Abhijeet Shinde

रत्नागिरी जिल्हा वनविभागाने ठरवला ‘हॉटस्पॉट’

Patil_p
error: Content is protected !!