Tarun Bharat

Ratnagiri : पोलिसांना चकवा देऊन आरोपीचे जंगलात पलायन

गुहागर चिखली येथील घटना; दुचाकीवरून आणत होते आरोपीला; चिपळूण कोर्टामधून आणत असताना घडली घटना

Advertisements

गुहागर/ प्रतिनिधी

चिपळूण कोर्टामध्ये हजर करून पुन्हा गुहागर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीला घेऊन येत असताना गुहागर चिपळूण मार्गावरील चिखली येथे आरोपीने पोलिसांना चकवा देत जंगलात पलायन केले आहे. सदर घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली. या आरोपीला गुहागर पोलीस ठाण्यातील पोलीस दुचाकीवरून आणत होते अशी माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून गुहागर पोलीस चिखली येथील परिसरामध्ये त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार एका तक्रारीवरून निगुंडळ येथील शिवराम नारायण साळवी हा संशयित आरोपी गुहागर पोलीस ठाण्यामध्ये अटक होता. त्याला आज चिपळूण न्यायालयामध्ये हजर करण्याकरता गुहागर मधील पोलीस दुचाकी वरून घेऊन गेले होते. चिपळूण वरून पुन्हा परत आणत असताना चिखली स्टॉपच्या दरम्याने आपल्याला लघुशंकेसाठी आरोपीने थांबवण्यास सांगितले. त्याप्रमाणे पोलीस यांनी दुचाकी थांबवली. मात्र या आरोपीने तेथून पलायन केले आहे. चिखली येथे जवळच दाट जंगल असल्याने त्यांनी त्या जंगलात पलायन केले आहे. या घटनेमुळे पोलिसांची धावपळ उडाली असून सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेत आहेत.

Related Stories

दापोलीत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Archana Banage

एसटी कर्मचाऱयांविरूद्धच्या तक्रारीची 7 फेबुवारीला सुनावणी

Patil_p

दापोलीतील मंडल अधिकारी अद्याप फरार

Patil_p

गुहागरचा प्रवास काखेत कळसा नि गावाला वळसा!

Patil_p

विसर्जनासाठी गणेशमूर्तींची कचऱयागाडय़ातून वाहतूक

Patil_p

रत्नागिरीत केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे जंगी स्वागत

Archana Banage
error: Content is protected !!