मौजेदापोली वार्ताहर
दापोलीच्या पाऱ्यात कमालीची घट झाली असून पारा 10.2 अंश सेल्सिअस इतका घटला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने हे तापमान नोंदवले आहे. यामुळे साहजिकच दापोलीकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे.
या आधी दापोलीचा पारा 18, 17, 16, 15 इतका होता. मात्र त्यानंतर 12, 11 ते आता 10.2 अंश सेल्सिअस इतकी घट झाली. यामुळे दुपारी 2 वाजेपर्यंत हवेत गारठा कायम रहात होता, तर त्यानंतर 4 वाजल्यानंतर पुन्हा थंड वारे वाहू लागतात आणि थंडी जाणवू लागते. त्यात हवामान विभागाने थंडीत वाढ होण्याचे संकेत जारी दिले आहेत. आंबा, काजू बागायतदार मात्र या थंडीमुळे सुखावलेला असल्याचे दिसत आहे.