डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 66 वा महापरिनिर्वाण दिन; रत्नागिरीत अभिवानादनासाठी मोठी गर्दी
रत्नागिरी प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रत्नागिरीतील शकडो अनुयायांनी सोमवारी मध्यरात्री 12 वाजताच बाबासाहेबांना अभिवादन केले. मंगळवारी रत्नागिरी येथील डाŸ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता.
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सोमवारी मध्यरात्री 12 वाजता सर्व वयोगटांतील अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. कोरोना निर्बंधांमुळे मागील 2 वर्षे अनुयायांना रत्नागिरी येथे येता आले नाही. यंदा निर्बंध नसल्याने 5 डिसेंबरच्या रात्री 9 पासूनच हजारो अनुयायांचे रत्नागिरीत आगमन झाले होते.
डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करण्याण्यासाठी रत्नागिरीच्या दिशेने अनुयायांचे जथ्थेच्या जथ्थे रात्री दाखल झाले. त्यांना शिस्तीने मार्गस्थ करण्यासाठी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. येथे मोठ्या संख्येने दाखल झालेल्या अनुयायांनी अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. वाहतुकीसोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.