रत्नागिरी प्रतिनिधी
तालुक्यातील जाकादेवी येथे मटका जुगाराच्या अड्ड्यावर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून कारवाई केल़ी. शनिवारी सायंकाळी 4 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आल़ी. यावेळी मटका चालवणाऱ्यावर संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आल़ा. प्रशांत गोविंद पाडावे (40, ऱा. मांदरे, जांगलदेववाडी) असे संशयिताचे नाव आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जाकादेवी येथे अवैधरित्या मटका व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार 9 जुलै रोजी सायंकाळी याठिकाणी ग्रामीण पोलिसांकडून छापा टाकण्यात आल़ा.या छाप्यात संशयित आरोपी प्रशांत पाडावे हा अवैधरित्या मटका चालवत असल्याचे पोलिसांना आढळून आल़े. त्याच्याकडून 870 रूपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आल़े.