Tarun Bharat

Ratnagiri : मुंबईतील व्यापारी खून प्रकरण : गळा आवळलेल्या दोरीचा पोलिसांना शोध

संशयितांचा पोलिसांना उलटसुलट जबाब; आज पुन्हा न्यायालयापुढे होणार हजेरी

Advertisements

रत्नागिरी प्रतिनिधी

ठाणे येथील सराफ व्यापारी किर्तीकुमार अजयराज कोठारी यांचा गळा आवळल्याची दोरी अद्याप पोलिसांच्या हाती लागली नाही. दोरीबाबत संशयित आरोपी पोलिसांना उलटसुलट जबाब देत आहेत. यामुळे तपास करणाऱ्या पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान शनिवारी संशयितांची पोलीस कोठडी संपत असल्याने पुन्हा एकदा त्यांना न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. यावेळी पोलीस कोठडी वाढवून मागतात का, याकडे लक्ष लागून राहिले आह़े

19 सप्टेंबर रोजी रत्नागिरीत सोने-चांदीच्या व्यवसायासाठी आलेले किर्तीकुमार कोठारी यांचा शहरातील त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होता. आर्थिक व्यवहारातून हा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक भूषण सुभाष खेडेकर (42, खालची आळी रत्नागिरी), रिक्षा चालक महेश मंगलप्रसाद चौगुले (39, मांडवी सदानंदवाडी रत्नागिरी) व फरीद महामूद होडेकर (36, भाट्ये खोतवाडी) यांना अटक केली. सध्या तीनही संशयितांना 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

किर्तीकुमार कोठारी यांचा खून केल्यानंतर 19 सप्टेंबर रोजी तीनही संशयितांनी मृतदेह एका मोठ्या गोणीमध्ये भरल़ा यानंतर रात्री दीडच्या सुमारास महेश चौगुले याच्या रिक्षात हा मृतदेह भरण्यात आला होत़ा. हा मृतदेह आबलोलीतील जंगलमय परिसरात पऱ्या मध्ये फेकून दिल़ा व्यापाऱ्यांकडे असलेली बॅग व गळा आवळल्यानंतर दोरीचे संशयितांनी काय केले, आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत़.

अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी रत्नागिरी शहरात त्रिमूर्ती नावाचे ज्वेलर्स चालवत़ो. त्या ठिकाणी नायलॉनची दोरी व गोणी कोठून व कोणी आणली, या बाबी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. तसेच व्यापाऱ्यांजवळ असलेल्या बॅगचे संशयितांनी काय केले, हे देखील समोर आले नाह़ी. या बॅगमध्ये काही सोने, चांदी व रोख रक्कम असल्याचा जबाब संशयितांनी पोलिसांपुढे दिला आह़े त्यानुसार पोलिसांनी जप्तीची कारवाई केली.

संशयित आरोपींनी कोठारी यांचा गळा आवळण्यासाठी वापरलेली दोरी हा महत्वाचा पुरावा ठरू शकत़ो. या दोरीबाबत पोलीस संशयितांकडे कसून तपास करत आहेत़. संशयितांकडून कधी दोरी जाळून टाकली तर कधी पऱ्यामध्ये फेकून दिली, असा उलटसुलट जबाब दिला जात आह़े. दोरी हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आह़े. दरम्यान संशयितांना शनिवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आह़े. यापूर्वी न्यायालयाने 6 दिवस व नंतर 3 दिवस अशी पोलीस कोठडी दिली होत़ी.

Related Stories

Ratnagiri : रेल्वेपुढे स्वत:ला झोकून देत आणखी एका तरूणाची आत्महत्या

Abhijeet Khandekar

संगमेश्वरमधे सापडला पहिला कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

दहिवलीतील दोघी कोरोनामुक्त

Patil_p

‘झारा बिल्डर्स’ला साडेनऊ लाख भरण्याची नोटीस

Patil_p

रत्नागिरी : मटका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

संगमेश्वर खाडीभागाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; झाडे कोसळली, लाखोंचे नुकसान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!