Tarun Bharat

पांढऱ्या समुद्रात तिघे बुडाले, एक बेपत्ता; दोघांना वाचवण्यात यश

Advertisements

आनंद लुटण्यासाठी गेले होते समुद्रात

प्रतिनिधी/रत्नागिरी

शहरातील पांढरा समुद्र येथे पाण्यात मजा करण्यासाठी गेलेल्या तिघा तरूणांपैकी एक जण बुडाला तर अन्य दोघांना वाचवण्यात यश आल़े ही घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ च्या सुमारास घडल़ी पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे बोलले जात आह़े दरम्यान बुडालेल्या तरूणाचा अद्याप शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आह़े.

तिघेही तरूण हे मुळचे बिहार येथील असून ते रत्नागिरीमध्ये इमारतीच्या बांधकामासाठी आले होत़े सोमवारी १५ ऑगस्ट निमित्त सुट्टी असल्याने हे तरूण पांढरा समुद्र येथे मौजमजेसाठी गेले होत़े. समुद्राच्या पाण्यामध्ये सेल्फी काढत असताना हे तरूण पाण्यामध्ये ओढले गेल़े. तिघेही तरूण बुडत असल्याचे दिसताच स्थानिकांनी पाण्यामध्ये उड्या घेतल्य़ा यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले तर अन्य एक जण पाण्यामध्ये बेपत्ता झाल़ा.

अमीर खान असे बुडून बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव आह़े. वाचवण्यात यशआलेल्या अमन खान याने सांगितले की, ते तिघेही शहरालगत असलेल्या फिनोलेक्स कॉलनी शेजारील कोस्टगार्ड रहिवासी संकुलाचे बांधकामाच्या ठिकाणी काम करतात़ तसेच गेल्या काही महिन्यांपासून ते रत्नागिरीतच वास्तव्याला आहेत़. दरम्यान या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आह़े. तर बेपत्ता तरूणाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आह़े. तर घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related Stories

Ratnagiri : शिवशाही आणि इर्टिगा कारच्या अपघातात दोघा चाकरमान्यांचा मृत्यू

Abhijeet Khandekar

कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील जिह्यांचा आढावा घेऊन आर्थिक मदत जाहीर करणार

Patil_p

गणपतीपुळे समुद्रकिनाऱयाला मिळणार ‘रिब्स’चे संरक्षण

Patil_p

आंतरराष्ट्रीय कॉलचे पाकिस्तान कनेक्शन उघड

Patil_p

प्रलंबित मागण्यांसाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांचा संप

Patil_p

कोरोनाच्या सावटाखाली जिल्हय़ात आज शाळांची घंटा वाजणाऱ!

Omkar B
error: Content is protected !!