प्रतिनिधी/गुहागर
तालुक्यातील पडवे येथील मुरलीधर यशवंत गडदे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या डोंगरभागाची दरड कोसळून घराची भिंत पडली आहे. गुरूवारी मध्यरात्रीहा प्रकार घडला. घराच्या स्वयंपाक खोलीच्या भिंतीवर दरडीतील दगड पडल्याने ही भिंतच पडली आहे. मात्र घरातील लोक सुखरूप आहेत.
दरम्यान, तालुक्यातील पडवे येथील मुरलीधर यशवंत गडदे आपल्या कुटुंबातील ६ सदस्यांसह या घरामध्ये रहात आहेत. गुरुवारी मध्यरात्री दरड भिंतीवर कोसळल्याने घराची भिंत पडली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण भिंत पडल्याने घराचे नुकसान झाले आहे.