नाणीजमध्ये भर वस्तीतील घटना; साडेबारा तोळे सोन्याचे दागिने लंपास
पाली प्रतिनिधी
तालुक्यातील नाणीज बाजारपेठेनजीक भर वस्तीत घरात एकट्या असलेल्या वृध्द महिलेवर हल्ला करून दागिने लुटल्याची घटना रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडल़ी विजया विलास केतकर (65) असे या महिलेचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी पाली ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आह़े भर दिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आह़े याप्रकरणी प्रशांत संतोष केतकर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आह़े पोलिसांनी चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आह़े पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजया केतकर 30 रोजी त्या घरामध्ये एकट्याच असताना रात्री 8.30 च्या सुमारास चोरट्याने मागील दाराने घरात प्रवेश केल़ा बेसावध असलेल्या विजया यांच्या डोक्यात लोखंडी सळीने वार केल़ा
चोरट्याने विजया यांच्या अंगावरील सोन्याचे पान व मण्यांची अडीच तोळे वजनाची माळ तसेच एकूण सुमारे साडे बारा तोळे वजनाचे दागिने घेऊन पोबारा केल़ा जखमी केतकर यांनी हल्ल्यानंतर आरडाओरड केल्याने शेजारच्या लोकांनी त्यांना उपचारासाठी पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे. तपासासाठी आलेल्या श्वानपपथकाने लगतच्या रस्त्याने केवळ काही मीटरपर्यंत माग काढला. ठसेतज्ञांनीही घटनास्थळी भेट दिली. आजूबाजूला घरे व माणसे असूनही चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सर्व शक्यता पडताळून तपास करीत आहेत. पाली विभागात दोन आठवड्यांत भर वस्तीत चोरीच्या दोन मोठ्या घटना घडल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे, हेडकॉन्स्टेबल संतोष कांबळे, मोहन पाटील, उदय वाझे, पोलिस नाईक राकेश तटकरी, अजय कांबळे, अमित कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्रशांत केतकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके करत आहेत.