चिपळूण प्रतिनिधी
शहरानजीक असलेल्या खेर्डी-शिवाजीनगर परिसरात असलेली पान टपरी अज्ञात चोरट्याने काही दिवसांपूर्वी फोडून दोन हजाराचा माल लंपास केला आहे. यापकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापकरणी श्रीधर मोहन किळजे (25, शिवाजीनगर, खेर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किळजे यांची पेंडस पान शॉप टपरी खेर्डी शिवाजीनगर येथे असून 28 ते 29 जूनदरम्यान ती अज्ञात चोरट्याने फोडली. त्यातून 2 हजार रुपये इतक्या किंमतीचा माल चोरुन नेला आहे. किळजे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.