Tarun Bharat

Ratnagiri : धडेकत पादचारी ठार, कारचालकावर गुन्हा दाखल

संगमेश्वर वार्ताहर

पादचाऱ्याला मागून धडक देत मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या कारचालकाविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात रमेश भुरवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30च्या सुमारास श्रीराम बारका भुरवणे (60, तेऱये गेल्येवाडी, ता. संगमेश्वर) हा तेऱये बुरंबी स्टॉप येथून तेऱये गेल्येवाडी असे चालत आपल्या घरी येत असताना राखाडी रंगाच्या इको कारची (एमएच 02 डीजे 3304) धडक बसली. कारचालक स्वप्नील सुहास ब्रीद (33, तांबेडी, ब्रीदवाडी, ता. संगमेश्वर) याने गाडी अतिवेगात चालवून श्रीराम यास पाठीमागून जोराची ठोकर दिल्याने त्यास गंभीर दुखापती होवून तो मृत झाला. या प्रकरणी स्वप्नील ब्रीद याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱयाला शिक्षा

Patil_p

अल्पवयीन मुलीशी गैरप्रकार, तरूणाला 5 वर्षे सक्तमजुरी

Patil_p

गणपतीपुळेत पर्यटकांसाठी प्रदूषणमुक्त कार!

Patil_p

रत्नागिरीत आठवडा बाजार सुरू होण्याबाबत निर्णय नाही

Patil_p

..अखेर ओझर-तिवरे तिठय़ावर सुरक्षादर्शक

Patil_p

जैतापूर अणूउढर्जा प्रकल्पासाठी फ्रान्सचा प्रस्ताव सादर

Patil_p