रत्नागिरी प्रतिनिधी
अवैधरित्या दारू बाळगणाऱ्या वर पोलिसांकडून धकड कारवाई करण्यात आल़ी. रत्नागिरी शहर व पूर्णगड पोलिसांकडून रविवारी छापा टाकण्यात आल़ा मिरजोळे पाटीलवाडी, गावखडी, रनपार याठिकाणी ही कारवाई करण्यात आल़ी याप्रकरणी 3 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल़ा त्यांच्याकडून पोलिसांनी अवैध दारू जप्त करण्यात आल़ी.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावखडी व रनपार येथे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होत़ी त्यानुसार 29 जानेवारी 2023 रोजी पूर्णगड पोलिसांकडून छापा टाकून कारवाई केल़ी यावेळी गावखडी भंडारवाडी येथे संतोष रामचंद्र कांबळी (41, ऱा गावखडी भंडारवाडी) याच्या ताब्यात अवैध गावठी दारू आढळून आल़ी तर रानपार दर्गारोड येथे दत्तात्रय लक्ष्मण सुर्वे (71, ऱा गोळप रनपार) यांच्या ताब्यात देखील अवैध गावठी दारू पोलिसांना मिळाल़ी.
तर रत्नागिरी शहर पोलिसांकडून रविवारी मिरजोळे पाटीलवाडी येथे अवैधरित्या दारू बाळगणाऱ्या वर कारवाई केल़ी रोशन रवींद्र आंबेकर (27, ऱा फणसवळे कोंडवाडी) असे संशयिताचे नाव आह़े त्याच्या ताब्यात पोलिसांना अवैध गावठी दारू आढळून आल़ी तिनही संशयितांविरूद्ध पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 ई नुसार गुन्हा दाखल केल़ा यापकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.
चिपळुणात दारु विक्रेत्यावर गुन्हा
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने-घाणेकरवाडी येथील एम.एस.ई.बी पॉवर हाऊसच्या मागे जंगलमय भागात बेकायदा हातभट्टीची दारु विकी करणाऱ्या विक्रेत्यांवर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. प्रविण बाळकृष्ण चव्हाण (54, मार्गताम्हाने) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद दिलीप विठ्ठल जानकर (चिपळूण पोलीस स्थानक) यांनी दिली आहे.