खेड / प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात रविवारी सायंकाळच्या सुमारास रसायन वाहतुकीचा टँकर उलटला. सुदैवाने गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला. चालक अल्ताफ हुसैन फिरोजखान घोरी (31, गुजरात) आपल्या ताब्यातील टँकरमधून (जी.जे. 12/ बी.टी. 8847) रसायन घेवून गुजरात येथून लोटे येथे जात होता. कशेडी घाटातील आंबा येथे उतारात चालकाचा ताबा सुटल्याने टँकर उलटला. कशेडी येथील वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी मदतकार्य केले. अपघातात टँकरचे मोठे नुकसान झाले आहे.