Tarun Bharat

कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट

सागरी सुरक्षा यंत्रणांकडून संशयास्पद वाहनांची तपासणी सुरु : सागरी महामार्गावर पोलिसांची नाकाबंदी

Advertisements

रत्नागिरी/प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात नौकेवर सापडलेल्या संशयास्पद शस्त्रसाठ्यामुळे किनारपट्टीवरील सर्व भागांमध्ये सागरीसुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. किनारपट्टी भागातील संशयास्पद नौकांची तपासणी करण्यात येत आहे. किनारपट्टीवरील पोलीस चौक्याना नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. एकुणच किनारपट्टी भागात सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा सतर्क झाली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने सागरी महामार्गावर ठिकठिकाणी चेकपोस्ट उभे करण्यात आले आहेत. सागरी महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

किनारपट्टीवरील भागातील लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस स्थानकांना कळवण्याच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत.

Related Stories

राफेलचा हवाई दलात समावेश हा संपूर्ण जगासाठी कठोर संदेश : राजनाथ सिंह

Rohan_P

दापोलीत कोविड सेंटरवर युवा सेनेची धडक

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आकडा आठशे पार

Abhijeet Shinde

सर्वपक्षीय बैठकीत भोंग्यांबाबत काय निर्णय झाला?

datta jadhav

सांगली : लॉकडाऊन करण्यापूर्वी गरिबांच्या पोटापाण्याची सोय करा : आमदार पडळकर, सदाभाऊ खोत

Abhijeet Shinde

‘आरटीई’ अंतर्गत 864 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

Amit Kulkarni
error: Content is protected !!