रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी पंचातय समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत हिच्या खून पकरणातील पती सुकांत उर्प भाई गजानन सावंत (47), रूपेश उर्प छोटा भाई कमलाकर सावंत (43) व पमोद उर्प पम्या बाळू रावणंग (ऱा. सर्व सडामिऱ्या रत्नागिरी) या तिन्ही संशयित आरोपींना 21 सप्टेंबर रोजी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
सोमवारी संशयित आरोपींना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होत़ी. यानुसार 21 सप्टेंबर रोजी पोलीस कोठडी संपल्याने या तिन्ही संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. या आधी सोमवारी संशयितांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी राहूल मनोहर चौत्रे यांच्यासमोर न्यायालयात हजर करण्यात आल़े. यावेळी तपास अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी न्यायालयापुढे सांगितले की, मृत स्वप्नाली सावंत हिचा मोबाईल अद्याप पोलिसांना आढळलेला नाह़ी. तसेच या प्रकरणात इतर काही दुवे आहेत का? या संदर्भात पोलिसांना तपास करावयाचा आह़े त्यामुळे संशयितांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी वाघमारे यांनी न्यायालयाला केल़ी यानुसार या तिन्ही संशयित आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संपूर्ण रत्नागिरी जिह्यात खळबळ उडवून लावणाऱया या प्रकरणाचा उलगडा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र आता या तिन्ही आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार आहे.