रत्नागिरी प्रतिनिधी
राजापूर तालुक्यातील परूळे येथे पत्नीचा खून करून भूताने मारल्याचा बनाव केलेल्या खून खटल्यात दोन साक्षीदार फुटल्याचे समोर आले आह़े. रत्नागिरी सत्र न्यायालयापुढे हा खटला चालवण्यात येत आह़े. फुटलेले साक्षीदार हे आरोपी याच्याच नात्यामधील असून त्यांना फितूर घोषित करण्यात यावे, अशी मागणी सरकारी पक्षाचे वकील पफुल्ल साळवी यांनी केली आह़े.
गजानन जगन्नाथ भोवड (40, ऱा परूळे राजापूर) असे या खटल्यातील आरोपीचे नाव आह़े. त्याच्याविरूद्ध पत्नी सिद्धी उर्प विद्या गजानन भोवड हिचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला आह़े. खटल्यातील माहितीनुसार, गजानन हा परळ मुंबई येथे प्रिटींग प्रेसमध्ये कामाला होत़ा. मात्र लॉकाडाऊनमध्ये नोकरी सुटल्याने तो पत्नी मुलांसह गावी वास्तव्याला आला होत़ा. दरम्यान, नोकरी नसल्याने त्याचे पत्नी सिद्धी याच्याशी सातत्याने वाद होत होत़ा.
25 जून 2021 रोजी गजानन हा पत्नी सिध्दी हिच्या बहिणीला बघण्यासाठी घरातून निघाले होत़े. जंगलातून जात असताना गजाननने अचानक सिध्दीचे नाक व तोंड दाबून धरले. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला होता. सिद्धी मृत झाल्याचे लक्षात येताच गजानन घरी आला व आजूबाजूच्या मंडळींशी बोलताना त्याने कथाच रचून सांगितली. आपण सिद्धीसमवेत जात असताना समोरुन एक पांढऱ्या चेहऱ्याची राकट व विचित्र दिसणारी एक व्यक्ती आली. त्या व्यक्तीने आपल्याला ढकलून दिले व पत्नीला उचलून तो जंगलात निघून गेला. तेव्हा आपली शुध्द हरपली होती. मात्र, त्यातून सावरल्यावर आपण घरी आलो, अशी कथा त्याने ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर तेथे उपस्थित असलेले अनेक ग्रामस्थ विद्याचा शोध घेत जंगलाच्या दिशेने निघाले. परुळे तट अशी त्या परिसराची ओळख असून तेथे शोध घेताना सिध्दी मृतावस्थेत आढळली होत़ी.
गजाननने पोलिसांनाही भूतापमाणे दिसणाऱ्या आपल्या पत्नीला ओढत नेल्याची कथा सांगितली. पोलिसांनी गजानन याची कसून चौकशी केली असता पत्नी सिध्दीचा खून आपणच केल्याची कबुली दिली. सिध्दी आपल्याला शिवीगाळ करत होती, त्रास देत होती. त्यामुळे आपण तिचा खून केल्याचे गजाननने दिली. भारतीय दंड विधान कलम 302, 201 अन्वये गुन्हा दाखल करून गजानन याच्याविरूद्ध न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले आह़े