Tarun Bharat

राऊतांचा दसरा कोठडीतच; मुक्काम 10 ऑक्टोबरपर्यंत वाढला

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्या न्यायालयीन कोठडीत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राऊत यांचा दसरा आता कोठडीतच होणार आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात 1 ऑगस्ट रोजी ईडीने राऊत यांना अटक केली होती. ते सध्या ऑर्थर रोड कारागृहात आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर 10 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात संजय राऊत अनुपस्थित असल्याने त्यांचं नाव असलेली खुर्ची रिकामी ठेवली होती. दसरा मेळाव्याच्या आधी राऊत बाहेर येतील आणि त्यांची तोफ पुन्हा धडाडेल, अशी शिवसैनिकांनी अपेक्षा होती. पण आण झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ केली. त्यामुळे राऊतांचा दसरा मेळावाही कोठडीतच होणार आहे.

अधिक वाचा : फडणवीस-पटोले यांच्यात बंद दाराआड चर्चा, चर्चांना उधाण

दरम्यान, न्यायालयीन कोठडीतील संजय राऊत यांचा दिनक्रम समोर आला आहे. ते आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यास आणि लेखनात घालवतात. त्यांना कोणत्याही प्रकारची व्हीआयपी वागणूक देण्यात आलेली नाही. कैदी क्रमांक 8959 अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या विरोधातील काही पुरावे सापडल्याने त्यांचा मीन मंजूर केला नसल्याची माहिती समोर आली आहे. कोठडीत राऊतांना लिहिण्यासाठी पेन आणि रजिस्टर देण्यात आले आहे. मात्र, ते लिखाण तुरुंगातून बाहेर जाऊ नये, तसेच कारागृहात काय लिहितात याची पुरेपूर काळजी कारागृह प्रशासन घेत आहे.

Related Stories

सातारा जिल्ह्यातील279 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 9 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू

Archana Banage

अज्ञाताचा अजित डोवाल यांच्या घरात जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न

datta jadhav

मंदिरे उघडण्याकरीता उद्या महाराष्ट्रात शंख-ढोल नाद आंदोलन

Tousif Mujawar

बालचमू रमले गड-किल्ल्यांच्या विश्वात

Archana Banage

‘यांना’ संपवण्यासाठीच राजकारणात: योगी आदित्यनाथ

Archana Banage

”एकतर महामारी त्यात पंतप्रधान अहंकारी”

Archana Banage
error: Content is protected !!