रविना टंडन लवकरच ‘कर्मा कॉलिंग’ या सीरिजमध्ये दिसून येणार आहे. रुची नारायण यांच्या दिग्दर्शनात तयार ही वेबसीरिज अमेरिकन सीरिज ‘रिव्हेंज’वर आधारित आहे. आशुतोष शाह यांच्याकडून निर्मित या सीरिजमध्ये रविना मुख्य भूमिका साकारत आहे. या सीरिजमध्ये ती इंद्राणी कोठारी ही भूमिका साकारणार आहे. या सीरिजचा टीझर जारी करण्यात आला असून यात रविनाच्या भूमिकेने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका श्रीमंत महिलेची भूमिका रविनाने उत्तमप्रकारे साकारल्याचे मानले जात आहे. ‘सक्सेस पाने के लिए कोई रुल्स नहीं होते हैं, कुछ सही-गलत नहीं होता, अपने उसूल, आदर्श और यहां तक अपने परिवार, सब भाड में जाए. लोक कहते हैं जैसा करोगे वैसा भरोगे, लेकिन मैं कहती, अगर दुनिया आपके कदमों पर हो तो कर्मा भी कुछ नहीं बिगाड सकता’ असा डायलॉग रविनाच्या तोंडी आहे. ही सीरिज 26 जानेवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये साकारलेली भूमिका यापूर्वी कधीच माझ्या वाट्याला आली नव्हती असे रविनाने म्हटले आहे. कर्मा कॉलिंग ही सीरिज श्रीमंतांच्या जगतातील सत्य मांडणारी आहे.
Previous Articleसंसद घुसखोरी प्रकरणी बागलकोटमधून एकाला अटक
Next Article पन्नू प्रकरणानंतर बदलला भारताचा सूर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.