Tarun Bharat

रवि इंगवलेंसह पदाधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा

गणेश विसर्जन मिरवणूकीत अश्लील हावभाव, आक्षेपार्ह शेरेबाजी

प्रतिनिधी/कोल्हापूर

गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये अश्लील शेरेबाजी करुन आक्षेपार्ह हावभाव केल्याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये रविकिरण इंगवले, राकेश माने, सोनु चौगुले यांच्यासह अन्य 40 कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश विसर्जन मिरवणूकी दिवशी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षिरसागर यांनी पापाची तिकटी येथे स्वागत मंडप उभारला होता. याचदिवशी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास फिरंगाई तालीम मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक या मंडपाजवळ आली. यावेळी राजकीय वादातून रविकिरण इंगवले, राकेश माने, सोनु चौगुले यांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱयांकडे पाहून अश्लील शेरेबाजी व आक्षेपार्ह हावभाव केले. या प्रकरणी शिंदे गट शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱयांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.

हे ही वाचा : रविकिरण इंगवले याच्यासह ४० शिवसैनिकांवर गुन्हा दाखल; राजेश क्षीरसागर म्हणाले; …तर ठोकून काढलं असत

Related Stories

शिरोळ तालुक्यातील कवठेसारमध्ये विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

Archana Banage

पुणे-अहमदाबाद एक्सप्रेस आता कोल्हापूरपर्यंत धावणार

Archana Banage

बालिंगे परिसरात गव्याचा वावर

Archana Banage

कोल्हापुरात फुटबॉल खेळाडूंची ऑनलाइन नोंदणी सुरू

Abhijeet Khandekar

राहुल पाटील जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष

Archana Banage

सत्तर गावातील शेतकऱ्यांची गैरसोय तरी कळे कृषी मंडळ कार्यालय बंदच

Archana Banage