दुबई/ वृत्तसंस्था
भारताचा आघाडीचा अष्टपैलू रविंद्र जडेजाला गुडघ्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागणार असून यामुळे तो ऑस्ट्रेलियातील आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार नाही, असे संकेत आहेत. शस्त्रक्रियेनंतर त्याला अनिश्चित कालावधीसाठी विश्रांती घ्यावी लागेल, असा अंदाज सूत्रांनी वर्तवला. ऑस्ट्रेलियातील आगामी टी-20 वर्ल्डकपला दि. 16 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. जडेजाने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत प्रथमश्रेणी, लिस्ट ए व टी-20 क्रिकेट प्रकारातील एकत्रित 630 सामन्यात 7 हजारपेक्षा अधिक षटके गोलंदाजी केली असून 897 बळी घेतले आहेत.