Tarun Bharat

RBI चा मोठा निर्णय; रेपो रेटबाबत घोषणा

ऑनलाईन टीम/तरुण भारत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (reserve bank of india) गव्हर्नर शक्तीकांत दास (Governor Shaktikanta Das) यांनी आज पतधोरण जाहीर केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या पतधोरण समितीच्या बैठक पार पडली, याबैठकीत गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण जाहीर करत, MPC ने पॉलिसी दरांमध्ये कोणताही बदल केलेला नसल्याचे सांगितले. तर रेपो दर (repo rate) कायम ठेवला आहे. तो 4 टक्क्यांवर कायम आहे. मध्यवर्ती बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करण्याची ही सलग 10 वी वेळ आहे. यापूर्वी, रिझर्व्ह बँकेने 22 मे 2020 रोजी रेपो दरात शेवटचा बदल केला होता.

रिव्हर्स रेपो दरात वाढ
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नरशक्तीकांत दास यांनी सांगितले की, रिव्हर्स रेपो दरात 0.40% वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता ते 3.75% पर्यंत वाढले आहे. तसेच मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट (MSFR) आणि बँक रेट 4.25 टक्के असणार आहे.

Related Stories

गव्हानंतर साखरेच्या निर्यातीवर बंदी शक्य

Patil_p

2-डीजी निर्मितीच्या तंत्रज्ञान हस्तांतरणाची तयारी

Patil_p

संजय राऊतांना लाज वाटली पाहिजे- आशिष शेलार

Archana Banage

सलग दुसऱ्या दिवशी हिसडा टोळीचा दणका; 90 हजाराचे पळवले मंगळसूत्र

Archana Banage

कुलभूषण जाधव यांचा फेरविचार याचिकेस नकार; पाकचा दावा

datta jadhav

बैलूर येथे नवरात्रोत्सवाची उत्साहात सांगता

Patil_p