Tarun Bharat

RBI च्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी

ऑनलाईन टीम / मुंबई : 

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या घोषणेनंतर आज शेअर बाजार आठवड्यातील तिसऱ्या व्यापारी दिवशीही हिरव्या रंगावर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४६०.३७ अंकांनी म्हणजेच ०.९४ टक्क्यांनी वधारून ४९६६१.७६ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३५.५५ अंकांनी म्हणजेच ०.९२ टक्क्यांनी वाढून १४८१९.०५ वर बंद झाला. 

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १२५.५५ अंकांनी वधारून ४९,३२६.९४ वर आणि निफ्टी २७.५० अंकांनी वधारून १४,७११.०० वर वाटचाल करत होता. 

दरम्यान, सेन्सेक्स मंगळवारी ४२.०७ अंकांनी म्हणजेच ०.०९ टक्क्यांनी वधारून ४९२०१.३९ वर बंद झाला होता. निफ्टी ४५.७० अंकांनी म्हणजेच ०.३१ टक्क्यांनी वधारून १४६८३.५० वर बंद झाला होता. 

Related Stories

सॅमसंगचा 110 इंची मायक्रो एलइडी टीव्ही

Patil_p

ऑटो क्षेत्रासाठी पीएलआय योजना आणण्याची तयारी

Patil_p

23 टक्के योगदानासह भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक- पियुष गोयल

Patil_p

जगातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये सावित्री जिंदाल 6 व्या स्थानावर; जाणून घ्या सर्वात श्रीमंत महिला आणि त्यांच्या कंपन्या

Abhijeet Khandekar

‘जीमेल’वर मेल, चॅटसह मिळणार अन्य सुविधा

Patil_p

सप्टेंबरमध्ये भरतीत 24 टक्के वाढ

Omkar B