मुंबई
सोन्याच्या बदल्यात कर्ज देणारी बिगर बँकिंग आर्थिक कंपनी (एनबीएफसी) मुथूट फायनान्सला भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांनी देशभरात जवळपास 150 शाखा उघडण्यासाठी मान्यता दिली आहे. तसेच कंपनीच्या माहितीनुसार देशातील दक्षिण व उत्तर भागात या शाखांचा प्रारंभ करण्याची योजना असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
अर्थव्यवस्थेमध्ये हळू-हळू नव्याने बदल होण्यासह सोने कर्जाची मागणी वाढत आहे. ही बाब विचारात घेत कंपनीला शाखा विस्तारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मंजुरी दिली आहे. तसेच या विस्ताराचा सकारात्मक परिणाम म्हणून आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सोने कर्ज मागणीत 12 ते 15 टक्के वाढ होणार असल्याची शक्यता कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज ऍलेक्झांडर मुथूट यांनी व्यक्त केली आहे.
कंपनीच्या सध्याच्या शाखांचे जाळे हे 4,617 आहे. तर कंपनीच्या शाखा आगामी दोन महिन्यात सुरु करण्याची योजना असल्याचे सांगितले जात आहे.