ऑनलाईन टीम / मुंबई :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आजपासून (18 एप्रिल) बँकांच्या कामकाजाच्या वेळेत बदल केला आहे. आजपासून बँका उघडण्याची वेळ (Bank Opening Time) सकाळी 9 वाजता करण्यात आली आहे. मात्र, बँक बंद होण्याच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा एक तास अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
कोरोना साथीमुळे बँका उघडण्याचा एक तास कमी करण्यात आला होता. जो आजपासून आरबीआयने पुन्हा सामान्य केला आहे. त्यामुळे बँकिंग व्यवहार करण्यासाठी अधिकचा एक तास ग्राहकांना मिळणार आहे. आरबीआयचा हा नियम स्टेट बँक ऑफ इंडियासह 7 सरकारी आणि 20 खासगी बँकांना लागू होणार आहे.
दरम्यान, एटीएममधून कार्डलेस व्यवहाराची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारीही बँकांमध्ये सुरू आहे. याद्वारे ग्राहकांना यूपीआयद्वारे बँका आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.