Tarun Bharat

कर्जाचा हप्ता आणखी वाढणार; RBI ने रेपो दरात केली वाढ

Advertisements

RBI Hike Repo Rate : आरबीआयचं पतधोरण जाहीर झाले असून रेपो दरात (RBI Hike Repo Rate) 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ तात्काळ लागू होणार असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आरबीआयच्या या निर्णयामुळे अर्धा टक्क्यानं वाढ झाल्यानं रेपो रेट ५.४० टक्क्यांवर गेला आहे. यामुळे कर्जाचा हप्ता आणखी वाढणार आहे. आरबीआयकडून वर्षभरात तिसऱ्यांदा रेपोरेटमध्ये वाढ करण्यात आली आहे.

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. यामुळे सर्वसामान्यांवर आणखी भार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्याज दर वाढवल्याने बाजारातील खरेदीवर नियंत्रण येते. त्याचा परिणाम मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त झालेले प्रमाण काही प्रमाणात संतुलित होते. त्यामुळे महागाईला आळा बसण्यास काही प्रमाणात मदत होते.

याआधी आरबीआयने मे 2022 मध्ये झालेल्या मॉनिटरी पॉलिसी बैठकीनंतर रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. त्यानंतर रेपो दर 4.40 टक्के झाला. त्यानंतर 8 जून 2022 मध्ये झालेल्या बैठकीनंतर रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रेपो दर 4.90 टक्के इतका झाला. आरबीआयने एकाच महिन्यात जवळपास 90 बेसिस पॉईंटची वाढ केली होती.

रेपो रेट म्हणजे काय?

रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसेच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

Related Stories

‘संभाजीराजे पटवता न येणारा माणूस’

Abhijeet Shinde

कर्नाटकातील अफगाणांना गृहमंत्र्यांनी दिले मदतीचे आश्वासन

Abhijeet Shinde

आरबीआयचं पतधोरण जाहीर ; व्याजदर जैसे थे!

Abhijeet Shinde

पाकिस्तानच्या संसदेत दहशतवादाविरुद्धचे विधेयक मंजूर

datta jadhav

ओमिक्रॉनचे निदान करणाऱ्या ‘ओमिशुअर’ला मंजुरी

datta jadhav

‘पवारांचाच मराठा, ओबीसी आरक्षणाला विरोध’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!