फिचचा अंदाज : रेपोरेट 5.9 टक्क्यांवर जाणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रिझर्व्ह बँक (आयआरबी) डिसेंबर 2022 पर्यंत रेपोदर जवळपास 5.9 टक्क्यांपर्यंत वाढविण्याची शक्यता आहे, असा अंदाज फिच रेटिंग एजन्सी यांनी नुकताच मांडला आहे. फिचने जागतिक पातळीवरील आर्थिक स्थिती व अन्य घडामोडींमुळे आरबीआयला रेपोरेट वाढवावा लागणार असल्याचे म्हटले आहे.
रेटिंग एजन्सी फिचने म्हटले आहे, की वाढत्या चलनवाढीमुळे व बिघडत चाललेल्या आर्थिक स्थितीमुळे आता आरबीआय डिसेंबर 2022 पर्यंत जवळपास रेपोरेट 5.9 टक्के आणि 2023 च्या अंतिम क्षणापर्यंत 6.15 टक्के करणार आहे. यामध्ये पुन्हा 2024 मध्ये वाढ केली जाण्याचा अंदाज नोंदवला आहे.
मागील महिन्यात निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्रमाविना बैठकीत आरबीआयने रेपो दर 0.40 टक्क्यांनी वाढवून 4.4 टक्के केला होता, आणि त्यानंतर मागील आठवडय़ात त्यामध्ये वाढ करुन तो 4.9 टक्के केला आहे. यासोबतच आरबीआयने चालू आर्थिक वर्षाच्या अंतिम तक्षणापर्यंत महागाई दर 6.7 टक्के राहणार असल्याचा अंदाज मांडला असून किरकोळ महागाईचा दर हा 7.04 टक्क्यांवर पोहोचणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले आहे.