Tarun Bharat

‘बटलर एक्स्पेस’ रोखण्याचे आरसीबीचे लक्ष्य

राजस्थान सर्व आघाडय़ांवर वर्चस्व गाजवण्यासाठी महत्त्वाकांक्षी

पुणे/ प्रतिनिधी

 गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आज सायंकाळी साडेसात वाजता राजस्थान रॉयल विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर सामना रंगणार आहे. गुणतालिकेत राजस्थान तिसऱया क्रमांकावर असून, रॉयल चॅलेंजर्सला अजूनही विराट कोहलीच्या फॉर्मची चिंता भेडसावत आहे.

  राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत सातपैकी पाच सामने जिंकत तिसऱया स्थानावर झेप घेतली आहे, तर बेंगळूर आठपैकी पाच सामने जिंकत पाचव्या स्थानावर आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये विराटला अजूनपर्यंत एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. या हंगामात तो तीनवेळा शून्यावर बाद झाला आहे. साहजिकच, रॉयल चॅलेंजर्सला त्याचा फटका बसत आहे. कर्णधार डय़ू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई यांच्याही फॉर्मची चिंता त्यांना आहे. दिनेश कार्तिक मात्र फिनिशरची उत्तम भूमिका बजावत आहे.

 रॉयल चॅलेंजर्सला एकूणच फलंदाजीची काळजी आहे. लखनौने मुंबईला हरविल्याने रॉयल चॅलेंजर्स पाचव्या क्रमांकावर फेकले गेले असून रॉयल चॅलेंजर्सला राजस्थानविरुद्ध सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. रॉयल चॅलेंजर्सची बॉलिंगही फारशी काही चमक दाखवू शकलेली नाही. हॅझलवूडलाही वेकेट काढण्यासाठी झगडावे लागत आहे. हर्षल पटेल, वणिंदू हसरंगा आणि महंमद सिराज यांनाही मॅच जिंकायची असेल तर चांगला मारा करावा लागणार आहे.

 दुसरीकडे राजस्थानच्या बाजूने सर्व काही सुरळीत सुरु आहे. जोस बटलर, देवदत्त पडिक्कल ही सलामीची जोडी उत्तम कामगिरी करत आहे. बटलरने या सीझनमध्ये तीन शतके मारुन आपण उत्तम फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले आहे. त्याला पडिक्कलचीही संयमी साथ मिळत आहे. यानंतर कर्णधार संजू सॅमसन, शिमरॉन हेतमेयर अशी तगडी फलंदाजीची फौज आहे. रियान पराग व करुण नायर हे मात्र कच्चे दुवे ठरत आले आहेत. त्यांची गोलंदाजीही उत्तम होत आहे. टेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मॅकॉय हे जलद गोलंदाजीची बाजू तर रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल हे फिरकी आघाडी सांभाळतील.

संभाव्य संघ

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर ः फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वणिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हॅझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रुदरफोर्ड, जेसॉन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार, सिद्धार्थ कौल.

राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार), वैष्णवी जैस्वाल, रियान पराग, शुभम गरवाल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, कुलदीप सेन, तेजस बरोका, अनुनय सिंग, केसी करिअप्पा, जोस बटलर, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन, नॅथन कोल्टर-नाईल, जिम्मी नीशम, डॅरेल मिशेल, करुण नायर, ओबेड मकॉय, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेतमेयर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, यजुवेंद्र चहल.

सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.

Related Stories

दुखापतीनंतर सिंधूचे पुनरागमन

Patil_p

हॅलेप, ऍनीसिमोव्हा अजिंक्य

Patil_p

विजेत्या अर्जेन्टिना संघाचे मायदेशात भव्य स्वागत

Patil_p

दिल्लीतील प्रदुषित वातावरणात आज उपांत्यपूर्व सामने

Patil_p

हार्दिक पंडय़ाचा अर्धशतकी झंझावात

Amit Kulkarni

बायचुंग भुतिया अध्यक्षपदासाठी उत्सुक

Patil_p