Tarun Bharat

“उद्धव ठाकरेंची ‘एक्झिट’ हे पेपरमध्ये वाचलं, पण मला वाटत नाही, कोण…”

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पच्छताप कोणाला होणार, आनंद कोणाला होणार याबद्दल मला काही माहिती नाही. मी या सर्व प्रकारापासून मी अनभिज्ञ आहे. राज्यात नेमके काय चाललंय याची कल्पना नाही. मला सर्व गोष्टी माध्यमातून कळत आहेत. उद्धव ठाकरेंची एक्झिट हे पेपरमध्ये वाचलं, पण मला वाटत नाही, कोण स्वतःची इतकी बदनामी करून घेईल हा अभ्यासाचा विषय आहे. आई आजारी असल्याने मी कोल्हापुरात आलोय. दोन दिवसांनी पंतप्रधान नरेद्र मोदींच्या हस्ते पुण्यात कार्यक्रम होणार आहे, त्यानंतर मी शिर्डीला जाणार आहे अशी प्रतिक्रया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडांनंतर दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट मिळून सरकार स्थापन करणार का? असं बोललं जात आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांचे दिल्लीत जाणे हे रुटीन आहे. ते पक्षाच्या कामानिमित्त दिल्लीला जात असतात. यावेळी ते दिल्लीत नेहमी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतात, त्यामुळे फडणवीस यासाठीच दिल्लीला गेले असं नाही, असे पाटील म्हणाले.

एका राष्ट्रीय पक्षाचं पाठबळ असल्याचं एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना मार्गदर्शन करताना म्हंटल होतं. यावर पाटील म्हणाले, देशात राष्ट्रीय पक्ष खूप आहेत, त्यांना विचारले पाहिजे नेमका कोणता राष्ट्रीय पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे भाजपचं शिंदे गटाच्या पाठीशी आहे, असा अंदाज लावणं योग्य नाही.

Advertisements

हेही वाचा : महाविकास आघाडीचं सरकार पडतंय याचं दुःख नाही- राजू शेट्टी

पुढे पाटील म्हणाले, राज्यात सुरु असलेल्या या घटनांशी भाजपचा काहीही संबंध नाही. कोणताही प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यास १३ सदस्यांची कमिटी बसते. खल करते एकमत करते आणि केंद्राला पाठवते. केंद्रचं संसदीय सदस्य अशा सगळ्या गोष्टींवर निर्णय घेते. भाजपकडून नियोजित काम सुरु आहे. महाराष्ट्रातील 16 मतदार संघ असे काढले आहेत की, जिथे लक्ष केंद्रीत करायचे आहे. तिथे १६ प्रवासी कार्यकर्ते त्यांचा प्रवासी करत आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रवास सुरु आहे. राज्यात चाललेल्या घटनांशी मात्र भाजपशी काही संबंध नाही. अस स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. या देशात अभिव्यक्ती स्वतंत्र्य आहे. पण शरद पवारांना आणि संजय राऊतांना जरा जास्त आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये त्यांना काही म्हणता येतं. त्यामुळे ते काहीही बोलत असतात. असा टोला पाटील यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाजपाच्या पाठींब्या संदर्भात केलेल्या विधानावर पाटील म्हणाले की,  राष्ट्रीय पक्ष खूप आहेत. नेमका त्यांना राष्ट्रीय पक्ष कोणता म्हणायचा आहे त्यांनाच विचारा.

कोणाला होणार, आनंद कोणाला होणार याबद्दल मला काही माहिती नाही. मी या सर्व प्रकारापासून मी अनभिज्ञ आहे. मला सर्व गोष्टी माध्यमातून मिळत आहे. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल का? यावर प्रश्नावर पाटील म्हणाले की, संजय राऊत सकाळी जे सकाळी म्हणतील ते सांयकाळी म्हणतील याची शाश्वती नाही. त्यामुळे त्यांना काय म्हणायचं ते मी सांगू शकत नाही, असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला आहे.

राज्यात सध्या ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत, त्याच्याशी भाजपचा काडीमात्र संबंध नाही असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही प्रस्ताव आला नसून तसा प्रस्ताव आल्यास त्यावर विचार केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : परदेशातही एकनाथ शिंदेंची चर्चा, गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर

शिंदे यांच्यासोबत कोण गेलेत, कोण जाणार आहेत, कोण परत येणार आहेत याबाबत आपल्याला काहीही माहित नाही. तसेच शिंदे यांच्यासोबत मोहित कंबोज असतील तर ते एकनाथ शिंदे यांचे मित्र असल्याने त्यांच्या सोबत असतील. कांबोज हे सर्व पक्षातील नेत्यांचे मित्र आहेत त्यामुळे कदाचित ते सर्वत्र दिसतात.

एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही सत्ता स्थापनेविषयी कोणताही प्रस्ताव आलेला नाही, प्रस्ताव आला तर पक्षाची १३ जणांची कार्यकारणी आहे, त्यांच्याशी चर्चा करून तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल. त्यांनतर पक्षाचे वरिष्ठ नेते जो काय निर्णय घेतील त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.

मी सध्या कोल्हापुरात आलो आहे, माझे रुटीन कार्यक्रम सुरू आहेत, काही राजकीय हा हालचाली भाजपकडून सुरू असत्या तर, मला कोल्हापुरात येऊ दिलं असतं का? असा सवाल त्यांनी यावेळी पत्रकारांना केला.

हेही वाचा : सत्ता गेल्यावर विरोधी बाकावरच बसावं लागणार- जयंत पाटील

Related Stories

लसीच्या भीतीने ग्रामस्थांची ‘शरयू’त उडी

Patil_p

राजू शेट्टींना पोलिसांनी घेतले ताब्यात

Abhijeet Shinde

एस. व्ही. आर. श्रीनिवास MMRDA आयुक्त; गृहनिर्माण प्रधान सचिवपदी मिलिंद म्हैसकर

Rohan_P

कोल्हापूर : जयसिंगपूर नगरपरिषद व आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य सर्वेक्षण सुरू

Abhijeet Shinde

हिरानंदानी समुहाच्या 24 ठिकाणांवर आयकरचे छापे

datta jadhav

नक्षलवाद्यांशी लढताना पंढरपूरचे पोलीस उपनिरीक्षक गडचिरोलीत शहीद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!