Tarun Bharat

विमानतळाबाबत माजी पालकमंत्री सतेज पाटील “काय” म्हणाले वाचा

Advertisements

कोल्हापूर – नागरी विमान उड्डाण प्राधिकरणाने कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग आणि विस्तारित धावपट्टीला मान्यता दिली आहे. गेली दोन वर्ष कोविड काळातही खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, तत्कालीन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह आपण केलेल्या पाठपुराव्याचे हे यश आहे अशी माहिती तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱयासमवेत वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. यामुळे काही महिन्यापूर्वीच कोल्हापूर विमानतळाला 3 सी आय एफ आर चा परवाना मिळाला. खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, तत्कालीन खासदार संभाजीराजे छत्रपती आणि आपण नागरी विमान प्राधिकरण संचालक अरुण कुमार, अरविंद सिंग, अंजू अग्रवाल, उड्डाण योजनेच्या सचिव उषा उपाध्ये, दिनेश शर्मा,मनोज कुमार गर्ग, संजीव कुमार यांच्याबरोबर बैठका घेऊन कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग सह अन्य प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. नाईट लॅडिग साठी महावितरणच्या अडथळा करणाऱया केबल अंडर ग्राउंड करण्यासाठी डीपीडीसीतून 1 कोटी रुपयांचा निधी दिल्याचेही आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूर विमानतळासंदर्भात दिल्लीत वेळोवेळी नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱयांची भेट घेतली. माझा सततचा पाठपुरावा आणि सर्वांच्या सहकार्यामुळे कोल्हापूर विमानतळाच्या नाईट लँडिंग आणि विस्तारित धावपट्टीचा प्रश्न मार्गी लागत आहे, याचा मनस्वी आनंद आहे.
आमदार सतेज पाटील, (माजी पालकमंत्री)

Related Stories

पुन्हा लॉकडाऊन नको असल्यास काळजी घ्या – आयुक्त

Abhijeet Shinde

भुदरगड मध्ये मराठा समाजामार्फत पाटगाव ते आदमापूर संघर्ष यात्रा

Abhijeet Shinde

जयप्रभा स्टुडिओचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार

Abhijeet Shinde

भादोले येथे अंधश्रद्धेतून आघोरी प्रकार घडल्याचे उघड

Abhijeet Shinde

बारवे येथे वीर माता-पित्यांचे हस्ते ध्वजारोहण

Abhijeet Shinde

कुंभोज हातकणंगले रोडवर फोर व्हिलर गाडी पलटी; कोणतीही जीवित हानी नाही

Sumit Tambekar
error: Content is protected !!