वृत्तसंस्था/ सेव्हेली
शनिवारी येथे झालेल्या कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेत रियल माद्रिद संघाने अंतिम सामन्यात ओसासुना क्लबचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. या सामन्यात रियल माद्रिदतर्फे रॉड्रीगो गोएसने 2 गोल नोंदविले. त्यापैकी एका गोलामध्ये रॉड्रीगो गोएसला त्याचा ब्राझीलीयन सहकारी व्हिनीसीयस ज्युनिअरचा सहभाग होता. गेली 9 वर्षे रियल माद्रिद संघाला हि स्पर्धा जिंकता आली नव्हती. माद्रिद संघाचे हे स्पॅनिश फुटबॉल क्षेत्रातील 20 वे विजेतेपद आहे.