Tarun Bharat

‘रियलमी’ कोकाकोला एडिशन फोन लाँच

21 हजार फोनची किंमत ः 14 फेबुवारीनंतर खरेदीसाठी उपलब्ध

वृत्तसंस्था/ मुंबई

‘रियलमी’ कंपनीने आपला 10 प्रो 5जी कोकाकोला एडिशनचा फोन नुकताच लाँच केला आहे. सॉफ्ट ड्रिंक बनविणारी कोकाकोला कंपनीची भागीदारी ‘रियल मी’ सोबत झाली आहे. त्यांच्या रंगाच्या स्कीमवर आधारित ‘रियलमी’ ने भारतात वरील फोन लाँच केला आहे. लाल आणि काळय़ा डिझाईनसह फोन लाँच केला असून सदरच्या फोनची किंमत 21 हजार रुपये इतकी असणार आहे.

8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोअरेजच्या या फोनला 14 फेब्रुवारीनंतर ‘रियलमी’च्या संकेतस्थळावर खरेदी करता येणार आहे. सोबत ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिप कार्ट व इतर अधिकृत रिटेल स्टोअरवर सदरचा फोन उपलब्ध होणार आहे. याला 6.72 इंचाचा एलसीडी डिस्प्ले असणार असून क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 695 चिप सेट असेल. ऍन्ड्रॉईड 13 वर चालणाऱया या फोनला 108 मेगा पिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 16 मेगा पिक्सलचा प्रंट कॅमेरा दिला गेला आहे.

Related Stories

सॅमसंगचा नवा एम-51 भारतात लाँच

Patil_p

नोकिया जी 60 5-जी स्मार्टफोन लाँच

Patil_p

नवीन आयफोन 5-जी एसइ लाँच

Patil_p

‘ऍपल’ने आयफोनची केली दमदार शिपमेंट

Patil_p

नॉइज कलरफिट स्मार्टवॉच सादर

Amit Kulkarni

ओप्पोचे इ स्टोअर मेमध्ये होणार सुरू

Amit Kulkarni