Tarun Bharat

रियलमी जीटी नीओ 3 टी स्मार्टफोन लाँच

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रियलमीने आपला नवा जीटी नीओ 3 टी स्मार्टफोन नुकताच लाँच केला असून 29 हजार रुपयांच्या पुढे याची किंमत असणार आहे.

सदरचा फोन तीन प्रकारात सादर करण्यात आला असून डॅश यलो, ड्रिफ्टींग व्हाइट व शॅडो ब्लॅक या रंगात तो येणार आहे. 6 जीबी रॅम ते 256 जीबीपर्यंत अंतर्गत स्टोरेजसह सदरचे फोन कंपनीने दाखल केले असून एकदा चार्ज केल्यावर  88 तासापर्यंत म्युझिकचा आनंद या फोनवर घेता येणार असल्याचे समजते.

येत्या 23 सप्टेंबरपासून ऑनलाइन व ऑफलाइन विक्रीकरीता नवा फोन उपलब्ध होणार आहे. 6 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 29 हजार 999 रुपये तर 8 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेजसह येणाऱया फोनची किंमत 31 हजार 999 रुपये असेल. 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजचा फोन सुमारे 34 हजार रुपयांना उपलब्ध होणार आहे. यासोबत 64 मेगापिक्सल प्रायमरी, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा फोनमध्ये असेल.

इतर वैशिष्टय़े

w 6.62 इंचाचा फुल एचडी प्लस

w 5 जीबीपर्यंत रॅम वाढवता येणार

w  क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 870 प्रोसेसर

w 80 डब्ल्यूचा सुपर डार्ट चार्जर

w 5000 एमएएचची लिथीयम आयन बॅटरी

w 29 तास कॉलिंग व 26 तासाची व्हिडीयो प्लेबॅकची सुविधा

Related Stories

शाओमीचा रोबोट व्हॅक्मयुम क्लीनर सादर

Patil_p

इनफिनीक्स नोट 10, नोट 10 प्रो बाजारात

Patil_p

‘इन’ आवृत्तीच्या दोन स्मार्टफोनचे सादरीकरण

Patil_p

रियलमीचा जीटी निओ 2 भारतीय बाजारात सादर

Patil_p

नॉर्ड एन 10 5जी व नॉर्ड एन 100 दाखल

Patil_p

आता गुगलचं टँगी ऍप

Omkar B
error: Content is protected !!