बजेटवाल्या स्मार्टफोनची किमत 7999 रुपये
नवी दिल्ली
रियलमी यांनी दिवाळी सणाच्या अगोदर भारतामध्ये आपला पहिला कमी बजेटमधील स्मार्टफोन ‘रियलमी नारजो 50 आय प्राईम’ हा बाजारात दाखल केला आहे. कंपनीने डार्क ब्लू आणि मिंट ग्रीन या कलरमधील दोन मॉडेल सादर केले आहेत.
सदरच्या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज यासह 4जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज मॉडेल दाखल केले असून यांची क्रमशः किमत 7,999 आणि 8,999 रुपये इतकी राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. सादरीकरणानंतर हा स्मार्टफोन ग्राहकांना 10 दिवसांच्या कालावधीनंतर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
आधुनिक फिचर्स…
नारजो 50 आय प्राईमच्या 4 जीबी रॅम 64 जीबी स्टारेजसह
ओक्टो कोर एससी 9863 ए प्रोसेसर असणार
6.5 इंच पूर्ण स्क्रीन
5000 एमएएच क्षमता असणारी बॅटरी मिळणार
डबल सिम मोबाईलमध्ये 3 कार्ड स्लॉट