तालुका युवा अधिकारी म्हणून वैभव पाटील : उपजिल्हा युवा अधिकारी हेमंत खातू नियुक्त : सेनेतील अंतर्गत पदाधिकारी बदलांना सुरूवात
प्रतिनिधी/रत्नागिरी
शिवसेनेतील पक्षांतर्गत उलथापालथीचे पडसाद आता पदाधिकारी बदलांपर्यंत पोहचले आहेत. रत्नागिरीतील शिवसेनेतही त्याची सुरूवात झाली असून बंडखोर आमदारांच्या समर्थकांची पदांवरून उचलबांगडी होऊ लागली आहे. रत्नागिरी तालुका युवासेनेच्या तालुका युवा अधिकारीपदी मिरजोळे येथील वैभव पाटील तर
उपजिल्हा युवा अधिकारी म्हणून पावस येथील हेमंत खातू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील बदललेल्या राजकीय घडामोडींनतर आता शिवसेनेने पक्षांतर्गत बदल केले जावू लागले आहे. बंडखोर आमदारांच्या समर्थकांची कार्यरत असलेल्या पदावरून हटवले जावू लागले आहे. त्या जागी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आल्या आहेत. सेनेतील बंडखोर आमदारांमध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांचाही समावेश आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आमदार सामंत समर्थक पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करयला सुरुवात करण्यात केली आहे. सेनेतील तालुका युवा
अधिकारी तुषार साळवी यांच्या जागी वैभव पाटील यांची तर केतन शेट्ये यांच्या जागी हेमंत खातू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हा सहसंर्पप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुका प्रमुख बंड्या साळवी, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे यांनी स्वागत केले.