Tarun Bharat

निवडणुकीत गद्दार पडतील, अन्यथा मी हिमालयात जाईन

Advertisements

औरंगाबाद, पुणे / प्रतिनिधी :

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून वारेमाप खर्च करण्यात येत असून, एका जिल्हय़ासाठी साधरणतः एक कोटीहून अधिक खर्च केला जात आहे. खोक्यामुळे हे सर्व शक्य होत असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला. गद्दार आमदार पडतील. अन्यथा, आपण हिमालयात जाऊ, असे आव्हानही त्यांनी दिले.

खैरे म्हणाले, महाराष्ट्रातील 44 जिल्हय़ांमध्ये जवळपास 51 कोटीपेक्षा अधिकच खर्च केला जाणार आहे. त्यामध्ये लोकांसाठी गाडी, जेवण, नाश्ता, चहा याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचे पुरावे माझ्याकडे आहेत. शिवसेना फोडण्यासाठी इतका मोठा खर्च केला जात आहे. ज्या शिवसेनेने यांना मोठे केले, त्याच पक्षाला संपवण्यासाठी यांना खर्च करावा लागतोय. त्यांना मिळालेल्या खोक्यामुळे ते हे करू शकतात.

अधिक वाचा, Pune : चांदणी चौकातील वाहतूक पूर्ववत

शिवसेनेतून फुटलेले कधीही निवडून येत नाहीत, असा इतिहास आहे. त्यामुळे भुमरे यांनी जास्त बोलू नये. आता आम्ही कमी पडणार नाही. सर्व बंडखोर आमदार पुढच्या निवडणुकीत सपाटून आपटतील. अन्यथा, आपण हिमालयात जाऊ, असे आव्हान देतानाच संदीपान भुमरे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांनी आधी पाचशे एकर जमीन, पाच वाईन शॉप कुठून आले, हे सांगावे. आता मी स्वतः मैदानात उतरलो आहे. त्यामुळे पालकमंत्री म्हणून काम करताना व्यवस्थित करावे. अन्यथा, माझे लक्ष असेल, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला. राज्याचे मंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार 30 टक्के घेऊन काम करतात, असे सांगत त्यांना सत्तार यांच्यावरही निशाणा साधला.

Related Stories

‘उद्धव ठाकरेंचा जन्म राज्य चालविण्यासाठी नाही’

Archana Banage

भोसरेत वार्षिक दिपोत्सव व शिवप्रताप दिन साजरा

Patil_p

वीज पडून दोघांचा मृत्यू

Patil_p

शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन

Tousif Mujawar

सोलापुरात पुन्हा लॉकडाऊन नाही; बार्शी शहर, तालुक्यात 31 जुलैपर्यंत संचारबंदी

Archana Banage

रायगडात 1535 नागरीकांचे स्थलांतर; देवेंद्र फडणवीस

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!