Tarun Bharat

गोव्यासाठी ‘बाल संगोपन’ शिक्षणाची शिफारस

टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

गोव्याच्या नवीन शैक्षणिक धोरणावरील कृती दल समितीने राज्यात ‘बाल संगोपन शिक्षण’ लागू करण्याची शिफारस केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या नवीन शैक्षणिक धोरणासंबंधीच्या (शालेय शिक्षण) राज्य कृती दल समिती बैठकीत   समितीने ‘बाल्य संगोपन शिक्षण’ लागू करण्याची शिफारस केली आहे.

‘बाल्य संगोपन शिक्षण’ लागू करण्याची शिफारस करणारा आपला अंतरिम अहवाल कृती दल समितीने नुकताच सरकारला सादर केला आहे,’ असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. बाल्य संगोपन शिक्षणाच्या टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीसाठी समितीने आपला ’रोड मॅप’ सादर केला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

435 शाळांना आभासी वर्गखोल्या

’राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ च्या अंमलबजावणीसाठी सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्याशिवाय गेल्या आठवडय़ातच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी, ’एका चांगल्या शिक्षकाला राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांना एकाचवेळी शिकवता यावे या उद्देशाने सरकार सर्व शाळांमध्ये ‘आभासी वर्ग’ सुरू करण्याच्या तयारीत आहे’, असे सांगितले होते. त्यानुसार राज्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित अशा सुमारे 435 शाळांना आभासी वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सध्या शिक्षण क्षेत्र खूपच गांभीर्याने घेतले असून सर्व शाळांमध्ये ‘आभासी वर्गखोल्या’ स्थापन करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

Related Stories

एनसीसी कॅडेट्सतर्फे आज पुनीत सागर अभियानची सांगता

Amit Kulkarni

सोनाभाट साळगाव येथे बेकायदा शेड उभारण्याचा प्रयत्न

Omkar B

छत्तीसगड 9 विकेट्सनी विजयी; गोव्याचा सलग पराभवांचा चौकार

Patil_p

शुभमच्या 5 विकेट्स; हिमाचल सर्वबाद 193, गोवा 1 बाद 92

Amit Kulkarni

राज्यपालांनी भाजप सरकार बरखास्त करावे – कामत

Patil_p

चंद्रकात कवळेकर यांनी केपे मतदार संघातून दाखल केला अर्ज

Sumit Tambekar
error: Content is protected !!