अमेरिकेच्या डेव्हिड रशची कामगिरी
विश्वविक्रम नोंदविण्याची कामगिरी करणे फारच कमी जणांना शक्य होत असते. यातील अनेक विश्वविक्रम ऐकून अवाप् व्हायला होते. डेव्हिड रश असाच एक रेकॉर्ड ब्रेकर असून त्याने 250 हून अधिक विक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत किंवा इतरांचे विक्रम मोडीत काढले आहेत.
अमेरिकेच्या इदाहो येथे राहणाऱया डेव्हिड रशने तोंडात 150 मेणबत्त्या ठेवून त्या पेटविल्या आहेत. 35 सेकंदांपर्यंत पेटत्या मेणबत्त्या तोंडात ठेवून त्याने आणखी एक विश्वविक्रम केला आहे. 250 हून अधिक विक्रम मोडीत काढलेला डेव्हिड रश स्वतःच्या कामगिरीद्वारे विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनियरिंग आणि मॅथेमेटिक्सच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतो.


डेव्हिड रशने तोंडात एकाचवेळी 150 मेणबत्त्या ठेवून त्या सर्व पेटविल्या. पेटत्या मेणबत्त्या तोंडात सुमारे 35 सेकंदांपर्यंत ठेवून त्याने गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न त्याने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात केला होता, परंतु तेव्हा त्याच्या तोंडातून मेणबत्त्या खाली पडू लागल्या होत्या. यामुळे तो अपात्र ठरला होता. परंतु त्याने हार न माता दुसऱयांदा प्रयत्न करत यात यश मिळविले आहे. तोंडात पेटत्या मेणबत्त्या ठेवल्याच्या काही सेकंदातच मेणबत्त्यांवरील पकड सुटू लागली, यामुळे दातांनी या मेणबत्त्या पकडून ठेवण्याचा प्रयत्न केल्याने अधिक थकायला होऊ लागले. डोळय़ांवर प्रोटेक्शन ग्लासेस परिधान करूनही मेणबत्त्यांच्या गॅसमुळे त्रास होऊ लागला होता. तोंडातून बाहेर पडणारी लाळही त्रास देत होती असे डेव्हिडने सांगितले आहे. तोंडात पेटत्या मेणबत्त्या ठेवण्याचा यापूर्वीचा विक्रम अमेरिकेच्या गॅरेट जेम्सच्या नावावर होता. जेम्सने 105 पेटत्या मेणबत्त्या तोंडात ठेवून विक्रम केला होता.