Tarun Bharat

‘२५ तास’ पाण्यावर तरंगत योगासने करण्याचा विक्रम..!

आंतरराष्ट्रीय योग दिन व आजादीका अमृत महोत्सव याचे औचित्य साधून योगतज्ञ संजीव हचिनमनी सलग २५ तास योगासनाचे प्रकार करीत पाण्यावर तरंगण्याचा उपक्रम पूर्ण करीत विक्रम स्थापन केला. केएलई सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात या २५ तास योगासनाद्वारे पाण्यावर तरगणाच्या उपक्रमाला सोमवार दि. २० रोजी सायंकाळी ४.३० वा. सुरूवात केली होती. मंगळवार दि. २१ रोजी सायंकाळी ५.३० वा. संजीव हंचिनमनी यांनी उपक्रम पूर्ण करून एक विक्रम स्थापित केला आहे. या उपव मानंतर उपस्थित जलतरणपटू प्रेक्षक व प्रमुख पाहुण्यांनी संजीव यांचे अभिनंदन केले. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, योग करो जीवन बढावो या घोषणाबाजी केल्या.

उपक्रमानंतर प्रमुख पाहुणे केएलई जेएनएमसी विद्यापिठाचे उपकुलगुरू विवेक सावजी, काहेरचे रजिस्टर डॉ. व्ही. ए. कोठीवाले, कृष्णकुमार जेल, स्विमर क्लबच्या अध्यक्षा लता कितुर, उपाध्यक्ष जी. एस. बेलकेरी यांनी संजीव हंचिनमनीचा कौतुक करून त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांना स्मृतीचिन्ह व चषक देवून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपकुलगुरू विवेक सावजी यांनी योगदिनाचे औचित्य साधून संजीव हंचिनमनीनी केलेल्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले. सध्याच्या तरूण पिढीने योग साधनेबरोबर जलतरण करताना योगचे धडे गिरविले पाहिजेत. सध्याच्या धावपळीच्या जगात माणसाला आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. जर आपले आरोग्य निरोगी व बळकट ठेवण्यासाठी योग व जलतरणाची आवश्यकता आहे. व्यायामासाठी आपण काही तास दिले पाहिजेत असे ते म्हणाले. यावेळी उमेश उमेश कलघटगी, सुधीर कुसाने, इंद्रजीत हलगेकर, अजिंक मेंडके, अक्षय शेरेगार, गोवर्धन काकतीकर, नितेश कुडुचकरसह, किल्लेकरसह डॉल्फिन ग्रूप उपस्थित होते.

या उपक्रमावेळी काहेर जेएनएमसी ग्रुप, एसीई ग्रुप, योगासन ग्रुप, संकल्पना योगासन ग्रुप, माहेश्वरी अंघ शाळा गट, असोसिएशन ऑफ फिजिकल हॅन्डिकॅप्ड ग्रुपसह इतर २५ जलतरण पटू त्यांना साथ दिली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जलतरणपटु व काहेरच्या सभासदांनी परिश्रम घेतले.

Related Stories

ऋषभ पंत, विहारीची नाबाद शतके

Patil_p

विराटला सूर सापडला, तरी शार्दुलच खरा हिरो

Amit Kulkarni

कर्नाटक: २०२३ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी ; राज्यव्यापी पदयात्रा काढणार

Archana Banage

भारताने मिसाईल डागलं; पाक लष्कराचा दावा

datta jadhav

अजित पवार हसले, आणि म्हणाले…

Tousif Mujawar

सेन्सेक्सचा ऐतिहासिक विक्रम; पहिल्यांदाच ६२ हजार पार

Archana Banage