नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील तेल क्षेत्रातील कंपनी ओएनजीसी अर्थात ऑईल ऍण्ड नॅचरल गॅस कार्पोरेशनने 2021-22 आर्थिक वर्षाचा निव्वळ नफा जाहीर केला आहे. कंपनीने सदरच्या आर्थिक वर्षात 40 हजार 305 कोटी रुपयांचा विक्रमी नफा प्राप्त केला आहे. कच्चा तेलाच्या वाढत्या किमतीमुळे नफ्यात विक्रमी वाढ झाली आहे. ओएनजीसीने चौथ्या तिमाहीत 31 टक्के वाढीसह 8 हजार 859 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे.