Tarun Bharat

आयपीएस अधिकाऱयांच्या नावे वसुलीचा फंडा

इन्स्टाग्रामवर बनावट खाती उघडून पैशाची मागणी, गुन्हेगारांच्या शोधासाठी प्रयत्न जारी

प्रतिनिधी/ बेळगाव

जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या नावे इन्स्टाग्रामवर बनावट खाती उघडून पैशांची मागणी करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारांनी आयपीएस अधिकाऱयांच्या नावेही गंडविण्याचा प्रयत्न सुरू केल्याने एकच खळबळ माजली आहे.

बेळगावला बदली होण्यापूर्वी डॉ. संजीव पाटील बेंगळूर पश्चिम विभागाचे डीसीपी होते. त्या नावे इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडण्यात आले आहे. यासाठी डॉ. संजीव यांचे नाव व फोटोचा वापर करण्यात आला आहे. सायबर गुन्हेगारांनी  त्यांच्या नावे पैशांची मागणी केली आहे.

शनिवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांनी तातडीने ट्विटरवरून नागरिकांना आवाहन केले आहे. आपला फोटो व नावाचा वापर करून इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडण्यात आले आहे. नागरिकांकडून पैशांची मागणी केली जात आहे. याला कोणीही प्रतिसाद देऊ नये, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीसप्रमुखांनी दिला आहे.

यापूर्वी फेसबुकवर असे प्रकार घडायचे. आयएएस, आयपीएस अधिकारी किंवा इतर प्रति÷ितांच्या नावे फेसबुकवर खोटे अकाऊंट उघडून पैशांची मागणी केली जात होती. आता फेसबुकवरील प्रकार कमी झाले आहेत. यासाठी सायबर गुन्हेगार, इन्स्टाग्रामचा वापर करीत असल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वीही अनेक पोलीस अधिकाऱयांच्या नावे बनावट खाती उघडून पैशांची मागणी करण्यात आली आहे.

निपाणी येथील एका गृहस्थाकडून 7 हजार 500 रुपये गुगल पे करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधितांचा शोध घेण्यासाठी जिल्हा सीईएन विभागाचे अधिकारी कामाला लागले आहेत. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

Related Stories

शाई हल्ल्याचा शिनोळी येथे निषेध

Amit Kulkarni

लोकमान्य’तर्फे सभासदांसाठी ‘धनलाभ-2023’ मुदतठेव योजना सादर

Amit Kulkarni

हिंदवाडी येथे जुगारी अड्डय़ावर छापा

Patil_p

सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली

Patil_p

तहसीलदारांच्या घरातच चोरी !!!

Rohit Salunke

कर्नाटक राज्य शिक्षणमंत्र्यांनी एसएसएलसी परीक्षा केंद्राला दिली भेट

Archana Banage