नियुक्ती रोखल्याने उमेदवारांचे भविष्य अंधकारमय
प्रतिनिधी /बेळगाव
औद्योगिक प्रशिक्षण आणि रोजगार (आयटीआय) कॉलेजमध्ये ज्युनियर ट्रेनिंग ऑफिसर म्हणून परीक्षा दिलेल्या उत्तीर्ण उमेदवारांना सेवेत कायम करावे, या मागणीसाठी बुधवारी सुवर्णसौधसमोर आंदोलन करण्यात आले. सरकारने नियुक्ती आदेश रोखून ठेवल्याने अनेक उमेदवारांचे भविष्य अंधकारमय होत असून त्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
केपीएससी अंतर्गत जीटीओ पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. फेब्रुवारी 2022 ला अंतिम यादी प्रसिद्ध होऊनही राज्य सरकारने त्यांच्या नियुक्त्या थांबविल्या आहेत. काही उमेदवारांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने पूर्ण प्रक्रियाच थांबविण्यात आल्याने इतर उमेदवारांवरही अन्याय होत असल्याने लवकरात लवकर नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.