Tarun Bharat

आयटी क्षेत्रात ऑक्टोबरमध्ये भरती घटली

युक्रेनसह इतर मुद्दे ठरले कारणीभूत ः जानेवारीत होणार वाढ

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी मागच्या ऑक्टोबर महिन्यात नोकर भरतीमध्ये जवळपास 43 टक्के इतकी घट दर्शवली आहे पण येणाऱया जानेवारी ते मार्च तिमाहीच्या कालावधीमध्ये नोकर भरतीत पुन्हा एकदा वाढ होऊ शकते असाही अंदाज सीआयइएल एचआर सर्व्हिसेस यांनी व्यक्त केला.

युपेन-रशिया युद्ध, स्टार्टअप कंपन्यांसाठी निधीची कमतरता या सर्व कारणास्तव आयटी क्षेत्राची वाटचाल सध्या धीम्या गतीने सुरू आहे. परिणाम म्हणून ऑक्टोबरमध्ये आयटी कंपन्यांनी 43 टक्के इतकी कमी भरती केल्याचे स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2022 च्या तुलनेमध्ये भरती संदर्भातली घट दिसून आली असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह व्यवसाय प्रक्रिया मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये अधिकतर भरती कमी दिसून आली आहे.

50 आयटी कंपन्यांकडून माहिती

ऑक्टोबरमध्ये एकंदर भरतीमध्ये जवळपास 4 टक्के इतकी घट दिसून आली आहे. वरि÷ व्यवस्थापन नेतृत्व करणाऱया कर्मचाऱयांची संख्या 10 टक्के इतकी कमी नियुक्तीमध्ये दिसली आहे. सीआयइएलच्या अहवालात या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे. त्यांनी जवळपास 50 आयटी आणि व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन कंपन्यांकडून भरतीसंबंधीची माहिती एकत्रित केली होती.

नव्या वर्षी भरतीत वाढ

आयटी क्षेत्र येत्या जानेवारी ते मार्च या तीनही मध्ये पुन्हा वेग घेणार असून दरम्यान भरती प्रक्रियेमध्ये पंधरा टक्के इतकी वाढ होण्याची शक्मयता आहे फर्मने व्यक्त केली आहे.

Related Stories

माधबी पुरी बुच ‘सेबी’च्या अध्यक्षपदी

Patil_p

युद्धाचा फटका, गॅस दरवाढीचा चटका

Patil_p

अमित खरे पंतप्रधान मोदींचे नवे सल्लागार

Patil_p

राजधानी दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या 6.38 लाखांच्या उंबरठ्यावर

Tousif Mujawar

युपीएच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न विचारणाऱ्या ममता बॅनर्जींवर काँग्रेसचा पलटवार

Archana Banage

लडाखनजीक चिनी सैन्याची मोठी तयारी

Patil_p