उडुपी जिल्ह्यात मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे या जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोडगु इथं जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयं आणि अंगणवाड्याना सुट्टी जाहीर केली आहे. याची दखल घेऊन पावसाने झाेडपलेल्या जिल्ह्यांच्या उपायुक्तांशी मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई यांनी चर्चा केली.
तात्काळ मदतकार्य सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच संततधार पावसामुळे किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यात घरांचं आणि मालमत्तेचं नुकसान झाले आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.