वृत्तसंस्था/ सुझुका, जपान
रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने येथे झालेल्या जपान ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीचे जेतेपद पटकावत सलग दुसऱया वर्षी ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपही मिळविली. त्याचाच संघसहकारी सर्जिओ पेरेझने येथील शर्यतीत दुसरे तर फेरारीच्या चार्लस लेक्लर्कने तिसरे स्थान मिळविले.
या मोसमात व्हर्स्टापनने वर्चस्व राखत चार शर्यती बाकी असतानाच चॅम्पियनशिप निश्चित केली. पावसात सुरू झालेली जपान ग्रां प्रि शर्यत अनेक कार आदळल्याने दोन लॅपनंतरच थांबवण्यात आली. दोन तासानंतर शर्यत पुन्हा सुरू करण्यात आली आणि 53 पैकी 28 लॅप्स पूर्ण करण्यात आले. व्हर्स्टापेनचे 366 गुण झाले असून दुसऱया स्थानावरील पेरेझचे 253 व लेक्लर्कचे 252 गुण झाले आहेत.