वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रेडमी या मोबाईल क्षेत्रात नावाजलेल्या कंपनीने नुकताच आपला नवा रेडमी के 50 आय स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. यासोबतच कंपनीने बडस् 3 लाइटचेही सादरीकरण केले आहे.
शाओमी कंपनीने सदरचा नवा स्मार्टफोन तोही के सिरीजमधला तीन वर्षानंतर भारतीय बाजारात उतरवला आहे, अशी माहिती आहे. 25 हजार 999 रुपये इतकी किंमत असणार असून 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजची व्यवस्था यात असेल. 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 28 हजार 999 रुपये असणार आहे. एमआयडॉटकॉम, एमआय होम, ऍमेझॉन, रिटेल स्टोरसह क्रोमा यांच्याकडे सदरचे फोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवर खरेदी केल्यास 3 हजाराची सवलत मिळणार आहे.
रेडमी इयरबडस् 3 लाइट कंपनीने आणले असून त्याची किंमत 1 हजार 999 रुपये असणार आहे. भारतात याची विक्री एमआयडॉटकॉम, एमआय होम, ऍमेझॉन व एमआय स्टुडियो यावर होणार असून 31 जुलैपासून विक्रीस सुरूवात होणार आहे. पहिल्या 48 तासात खरेदी करण्याचा विचार केल्यास सवलतीत 1499 रुपयांना मिळतील.