Tarun Bharat

शहरांतर्गत बस तिकीट दरात कपात

परिवहनच्या निर्णयाने प्रवाशांना दिलासा : सुटय़ा पैशांच्या समस्येवर तोडगा

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

सुटय़ा (चिल्लर) पैशांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी परिवहनने शहरांतर्गत बस तिकीट दरात कपात केली आहे. शहरांतर्गत बस प्रवाशांच्या पहिल्या स्टेजसाठी एक रुपये तर दुसऱया स्टेजसाठी तिकीट दरात दोन रुपयांची घट करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. शिवाय बसवाहक आणि प्रवाशांची चिल्लर पैशांसाठी होणारी दैनंदिन कटकटही थांबणार आहे.

शहर आणि शहराजवळील गावच्या बसतिकीट दरात कपात करण्यात आली आहे. पहिल्या स्टेजसाठी 6 रुपये तिकीट दर होता. तो आता पाच रुपये करण्यात आला आहे. त्याचबरोबर दुसऱया स्टेजसाठी 12 रुपये तिकीट दर होता. तो आता 10 रुपये करण्यात आला आहे.

डिझेलच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने परिवहनच्या बसतिकीट दरातही वाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. मात्र अद्याप तिकीट दरात वाढ झाली नाही. उलट शहरांतर्गत बसतिकीटचा दर कमी झाला आहे. कोरोनामुळे परिवहनला प्रचंड तोटा सहन करावा लागला आहे. दरम्यान महसुलाच्या तुलनेत खर्च वाढल्याने परिवहन अडचणीत आले आहे. अशा परिस्थितीत तिकीट दर वाढविण्यासाठी परिवहनने राज्य सरकारकडे प्रस्ताव ठेवला होता. मात्र अद्याप तिकीट दरवाढीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. मात्र बेळगाव परिवहन मंडळाने बसच्या तिकीट दरात काही प्रमाणात घट केली आहे. त्यामुळे महागाईच्या संकटात होरपळून गेलेल्या जनतेला थोडासा दिलासा मिळाला आहे.

पहिल्या-दुसऱया स्टेजसाठी दरकपात

शहर आणि आजूबाजूला सेवा देणाऱया बसच्या तिकीट दरात घट करण्यात आली आहे. शुक्रवारपासून ही दर कपात लागू केली जाणार आहे. पहिल्या आणि दुसऱया स्टेजसाठी दरकपात करण्यात आली आहे.

के. के. लमाणी

विभागीय वाहतूक अधिकारी

शहरांतर्गत बससेवेचा नवीन तिकीट दर

मार्गजुना तिकीट दरनवीन तिकीट दर
सीबीटी-कोर्ट6 रु.5 रु.
सीबीटी-डीएससी12 रु.10 रु.
शहापूर नाका-वडगाव6 रु.5 रु.
हरिमंदिर-अनगोळ6 रु.5 रु.
सीबीटी-गांधीनगर6 रु.5 रु.
बाळेकुंद्री खुर्द-मोदगा12 रु.10 रु.
काकती-होनगा6 रु.5 रु.
काकती-यमनापूर6 रु.5 रु.
होनगा-यमनापूर12 रु.10 रु.
कोर्ट-केएलई12 रु.10 रु.
सीबीटी-महांतेशनगर6 रु.5 रु.
सीबीटी-वंटमुरी12 रु.10 रु.
सीबीटी-अशोकनगर6 रु.5 रु.
मासमर्डी-शगनमट्टी12 रु.10 रु.
ह.बस्तवाड-हलगा12 रु.10 रु.

Related Stories

स्वच्छतेत बेळगावला 228 वे स्थान

Patil_p

कुडचीत पोलीस बंदोबस्त कायम

Patil_p

वाडा कंपाऊंड, अनगोळमध्ये तिळगूळ समारंभ

Omkar B

येळ्ळूरच्या कुस्ती मैदानाला छत्रपती मालोजीराजे उपस्थित राहणार

Omkar B

वरेरकर नाटय़ संघात रंगभूमी दिन साजरा

Patil_p

शहापूर परिसरात राबविल्या खबरदारीच्या उपाययोजना

Patil_p
error: Content is protected !!