Tarun Bharat

भाजपा सरकारमुळे रिफायनरीला मिळेल चालना

Advertisements

रत्नागिरीत गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केला विश्वास

प्रतिनिधी/ रत्नागिरी

मागील सरकारच्या आडमुठय़ा धोरणामुळे रिफायनरी प्रकल्पाला खिळ बसली होती. मात्र आता राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाला चालना मिळेल, असे संकेत गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिले.

  केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा कोकण दौऱयावर होते. शुक्रवारी सकाळी 9.15 वा. राजापूर तालुक्यातील गोठणे दोनिवडे येथे त्यांची अनुसूचित जाती जमातीच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱयांशी बैठक घेतली. त्यानंतर 11.30 वा. लांजा तहसील गोडाऊन येथे शासकीय गोदाम, पोषण आहार साठवणुकीचा आढावा घेतला. तेथून ते देवरुखला रवाना झाले. सायंकाळी 4 वा. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीच्या बैठकीत विविध योजना व विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर 5.30 वा. त्यांनी भाजपाच्या जिल्हा संपर्क कार्यालयात केंद्र सरकारच्या विविध योजना व विकासकामांबाबत पत्रकारांशी चर्चा केली. सायंकाळी 6 वा. त्यांची जिल्हा प्रशासनासंबंधी महत्वाची बैठक झाली. सायंकाळी 6.30 वा. त्यांनी वकील, डॉक्टर्स आदींशी संवाद साधला

 पत्रकार परिषदेत त्यांनी विश्वास व्यक्त केला की, भविष्यात रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये भाजपाचे खासदार व आमदार निवडून येतील. रत्नागिरी विमानतळाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. काही सुरक्षेच्या बाबी आहेत. त्या बाबत अधिकाऱयांशी चर्चा सुरू आहे. लवकरच विमानतळाचे काम पूर्ण होईल. 2 महिन्यात रत्नागिरी व सिधुदुर्ग जिह्यात बीएसएनएलच्या 4 जी सेवेला प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आकाशवाणी व दूरदर्शनच्या सेवा रत्नागिरीत बंद का झाल्या, यांची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची हमी त्यांनी यावेळी दिली.

  महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक शिवसेना व भाजपा एकत्र लढली होती. मात्र शिवसेनेने विश्वासघात करत भाजपाच्या पाठीत खंजीर खूपसला, असेही त्यांनी सांगितले. रत्नागिरी जिह्यात आयुष्यमान योजनेची 1 लाखापेक्षा जास्त सुवर्ण कार्डे देण्यात आली आहेत. जिह्यात किसान सन्मान योजनेचा फायदा 2 लाख 13 हजार शेतकऱयांना देण्यात आला आहे. हर घर शौचालय, ग्रामीण सडक योजना आदी महत्वपूर्ण योजना सरकार राबवत आहे. मधल्या काळात उध्दव ठाकरे सरकारने या योजना बंद केल्या होत्या, त्या आता पुन्हा सुरू होतील, असे ते म्हणाले.

 ईडीची कारवाई योग्यच आहे. यात आठ वर्षात 1 लाख करोडपेक्षा जास्त संपती, रोकड जप्त झाली आहे. हा पैसा कुठून आला, असा सवाल करत इडीची कारवाई योग्य प्रकारे होत असल्याचे ते म्हणाले. सध्याचे महाराष्ट्रातील सरकार आपला कालावधी पूर्ण करेल. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने हे सरकार कोसळेल, अशी विधाने विरोधक करत आहे. पेंद्रात व राज्यात आता भाजपाचे सरकार असल्याने विरोधकांमध्ये निराशा पसरली आहे. ते हताश झाल्याने अशी विधाने करत असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

 या बैठकीला भाजपा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, ऍड. बाबा परुळेकर, सचिन वहाळकर, उमेश कुलकर्णी, सचिन करमरकर आदी उपस्थित होते.

Related Stories

श्वसनाच्या आजाराचे आणखीही काही रुग्ण!

NIKHIL_N

‘साहेब पाठीवर मारा, पण पोटावर मारू नका’

Patil_p

वाहतूक पोलिसांना पेटविण्याचा प्रयत्न

NIKHIL_N

मासेमारी जोर धरतेय

NIKHIL_N

आंग्रीया बेट अखेर संरक्षित होणार

NIKHIL_N

दर्जाहीन झेंडे ग्रामपंचायतींच्या हाती

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!