तरुण भारत

ज्ञानव्यापी मशीद सर्वेक्षण स्थगितीस नकार

सर्वोच्च न्यायालय कागदपत्रे पाहून निर्णय घेणार, आज मशीदीच्या आत पाहणी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

वाराणसीतील काशी विश्वेश्वर ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे पाहूनच यासंबंधी निर्णय घेतला जाईल, असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी स्पष्ट केले. मुस्लीम पक्षकारांनी हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात नेले आहे.

ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण सध्याच्याच कोर्ट कमिशनरच्या अधिपत्यात केले जावे. तसेच मशीदीच्या आतल्या भागातही सर्वेक्षण आणि व्हिडीओ चित्रण केले जावे. कोणी अडथळा आणल्यास योग्य ती कारवाई करावी. कुलुप लावले असल्यास ते तोडून सर्वेक्षण व चित्रण करावे, असा आदेश गुरुवारी वाराणसी येथील न्यायालयाने दिला होता. त्याविरोधात मुस्लीम पक्षकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. तथापि, तेथेही त्यांना अपेक्षित निर्णय त्वरित मिळालेला नाही.

आज होणार सर्वेक्षण ज्ञानवापी मशिदीच्या आतल्या भागात आज सर्वेक्षण होणार आहे. कोर्ट कमिशनर अजय कुमार मिश्रा यांच्या नेतृत्वात ते होणार आहे. यासाठी सर्व सज्जता करण्यात आली आहे. प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवलेली असून पोलीस दले नियुक्त केलेली आहेत. आवश्यकता भासल्यास आणखी सुरक्षा देण्यात येणार आहे. ही मशीद हिंदूंचे प्राचीन शिवमंदिर पाडवून त्याच्यावर बांधलेली आहे, असे हिंदूंचे म्हणणे आहे. मुस्लीमांनी मशिदीच्या आतल्या भागात सर्वेक्षण करण्यास विरोध केलेला असून तीन दिवसांपूर्वी सर्वेक्षण दलास मशिदीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलेले होते.

Related Stories

एकसारखे कपडे घालणाऱया मायलेकी

Patil_p

देशात चोवीस तासात 25,320 नवे रुग्ण

Patil_p

नितीन गडकरी यांची कोरोनावर मात

Rohan_P

उत्तर प्रदेश : कन्नोज जिल्ह्यात झालेल्या अपघातात 3 जण जागीच ठार

Rohan_P

एसबीआयने वाढवले मुदत ठेवींवरील व्याजदर

Patil_p

‘मुस्लीम चार पाकिस्ताने निर्माण करतील’

Amit Kulkarni
error: Content is protected !!