Tarun Bharat

कब्रस्तानसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे

नगरसेवक महेश आमोणकर, मुस्लिम बांधवांची मागणी

प्रतिनिधी /मडगाव

सोनसडा येथे कब्रस्तानसाठी दिलेल्या जागेचा झोन बदलल्याने तो बदल मागे घेण्यासाठी उपोषणाला बसलेले मडगाव पालिकेच्या प्रभाग 15 चे नगरसेवक महेश आमोणकर तसेच मुस्लिम बांधवांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले होते. त्यानुसार सदर आश्वासन पूर्ण करण्याची मागणी नगरसेवक आमोणकर व मुस्लिम बांधवांनी केली आहे.

4 जानेवारी, 2022 रोजी उपोषणास बसलेल्या नगरसेवक आमोणकर तसेच मुस्लिम बांधवांची तत्कालीन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी भेट घेतली होती व आजगावकर यांनी भ्रमणध्वनीवरून मुख्यमंत्री सावंत यांच्याशी संपर्क साधला असता मुख्यमंत्र्यांनी आवश्यक कृती करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर 6 रोजी तिसऱया दिवसानंतर सदर उपोषण मागे घेण्यात आले होते.

निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्याने व नंतर निवडणुका आल्याने आमची मागणी पूर्ण होऊ शकली नव्हती. आता भाजपाला पुन्हा सत्ता मिळाली असून डॉ. सावंत हेच पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने ते विनाविलंब दिलेले आश्वासन पूर्ण करतील याची आम्हाला खात्री आहे, असे आमोणकर व रियाज शेख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आम्ही लवकरच मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेणार आहोत. आता नगरनियोजन खात्याचे मंत्री बदलले असून विश्वजित राणे हे नवे मंत्री आहेत, तर दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाचे दाजी साळकर हे अध्यक्ष बनले आहेत. त्यांची काही जण दिशाभूल करू शकतात. त्यामुळे त्यांना यासंदर्भात विश्वासात घेतले जाईल, असे आमोणकर यांनी सांगितले.

सोनसडय़ाऐवजी खारेबांद येथे सदर कब्रस्तान उभारण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र अधिसूचित केलेल्या जमिनीचा 25 टक्के हिस्सा पालिकेच्या क्षेत्रात, तर 75 टक्के हिस्सा पंचायत क्षेत्रात येत असल्याने तेथे कब्रस्तान उभारणे शक्मय झाले नाही. खारेबांद येथील सदर जागेत राहणाऱयांकडून एका व्यक्तीने जागेचे पैसे म्हणून लाखो रुपये लुटले असून ते त्यांना परत करण्याची गरज आहे. अन्यथा आम्ही हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे मांडून आवश्यक कारवाई करण्यास सांगणार तसेच पोलीस तक्रार करणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

दिव्यागांनी जिंकली गोमंतकीयांची मने

Amit Kulkarni

कोरोनासंबंधी सावधगिरी बाळगा

Patil_p

म्हादई प्रश्नी सुनावणी तातडीने घ्यावी

Amit Kulkarni

वीस कोटींची खंडणी मागणाऱयास अटक

Omkar B

पेडणे आठवडा पुरुमेताच्या बाजारात महागाईची झळ

Amit Kulkarni

डॉ.पी.एस.रामाणी संग्रहालयाचे 14 रोजी उद्घाटन

Amit Kulkarni